Posts

बालाजी वारी एक अमृतानुभव

 *बालाजी वारी...             एक अमृतानुभव....!* श्रावणाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती बालाजीच्या वारीची....बालाजीची श्रावण वारी म्हणजे तमाम नाशिककरांसाठी एक मोठी आनंद पर्वणीच...या पर्वणीत दुमदुमतो तो निस्सीम भक्तीतून व्यक्त होणारा....       गोविंद नामाचा गजर....!!_ वारीमय झालेले हजारो वारकरी जेहान सर्कल ते बालाजी मंदिर हा सहा किलोमीटरचा रस्ता तुडवत परमात्मस्वरूप बालाजीच्या दर्शनाला  जातात..., आणि हा अनुपम सोहळा तमाम नाशिककर तल्लीन होऊन पहातात.... वारीच्या नियोजनकर्त्या टीमचे कौतुक काय आणि किती करावे...,एरवी दररोज "सू-र्य-वं-शी" असणारी ही मंडळी,श्रावण शुक्रवारी मात्र शुचिर्भूत होऊन भल्या सकाळी वारीच्याप्रस्थान स्थानी पोहोचून नियोजनात गर्क झालेली दिसतात...., कुठे ही,काही ही कमी पडू नये यासाठी त्यांचा अट्टहास सुरू असतो..., महिलांची धावपळ तर विचारूच नका... सगळं आवरून वारीसाठी वेळेवर पोहोचण्याची त्यांची पळापळ आणि आटापिटा,पाहून ऑलिम्पिक विजेत्या धावपटूना ही हेवा वाटावा....! "श्री निवासा गोविंदा,     श्री व्यंकटेशा गोविंदा,     गोविंदा हरि गोविंदा,      गोकुल नंदन गोविंदा...